You are currently viewing भरणी वासियांची समस्या आमदार वैभव नाईक यांनी केली दूर

भरणी वासियांची समस्या आमदार वैभव नाईक यांनी केली दूर

भरणी आगरवाडी पुलाच्या कामाचे भूमिपूजन

नाबार्ड योजनेंतर्गत १ कोटीचा निधी मंजूर

पणदूर घोटगे मुख्य रस्ता ते भरणी आगरवाडी जाणाऱ्या रस्त्यावर मंजूर करण्यात आलेल्या पुलाचे भूमिपूजन आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार विनायक राऊत पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नाबार्ड योजनेंतर्गत या पुलासाठी १ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
भरणी आगरवाडी येथील नदीवर जुना पूल कमी उंचीचा असल्याने पावसाळ्याच्या कालावधीत सलग तीन महिने या पुलावरून पाणी जात असल्याने अनेक वेळा वाहतुक ठप्प होत होती. त्यामुळे गावातील नागरिकांचा संपर्क तुटत होता.पूल जीर्ण झाल्याने ग्रामस्थांनी हा पूल नवीन बांधण्याची मागणी केली होती. अखेर त्यांची मागणी आता पूर्ण झाली असून प्रत्यक्षात पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याबरोबर दर्जेदार काम करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी ठेकेदार अनिस नाईक यांना दिल्या आहेत.
यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख महेश सावंत, युवासेना विभाग प्रमुख निशांत तेरसे, उप विभागप्रमुख राजू परब, शाखा प्रमुख गणपत घोगळे, भरणी सरपंच प्रिया परब, सोनवडे शाखा प्रमुख गुरुनाथ मेस्त्री, सोनवडे उपसरपंच वामन गुरव, उदय मडव, तेजस भोगले, काशीराम घाडीगावकर, तंटामुक्ती अध्यक्ष नारायण घाडीगावकर, प्रकाश परब, अशोक परब आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =