You are currently viewing पाकिस्तानच्या पेशावरमधील मदरशाजवळ स्फोट

पाकिस्तानच्या पेशावरमधील मदरशाजवळ स्फोट

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या पेशावरमधील एका मदरशाजवळ स्फोट झाला आहे. दिर कॉलनीत असलेल्या मदरशाजवळ झालेल्या स्फोटात ७ बालकांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक जण जखमी झाल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिलं आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू झालं आहे. जखमी बालकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरू आहे. यातील अनेक बालकांची प्रकृती गंभीर आहे.

स्फोटातील जखमींना लेटी रीडिंग रुग्णालयाचे प्रवक्ते मोहम्मद असीम यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात ५० जखमींना मृतदेह दाखल करण्यात आले आहेत. जखमींवर तातडीने उपचार करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाच्यावतीने देण्याात आली असल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिलं आहे.

पेशावरमध्ये झालेल्या स्फोटामध्ये १९ मुले जखमी झाल्याची माहिती असून जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी मुलांना लेडी रीडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी मुलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 2 =