You are currently viewing मालवण ग्रामीण रुग्णालयाला दोन तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती

मालवण ग्रामीण रुग्णालयाला दोन तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती

मालवण ग्रामीण रुग्णालयाला दोन तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती

आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञांची सेवा उपलब्ध

आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी व्यक्त केले समाधान

मालवण

मालवण ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही नियुक्ती झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
शासनाच्या आदेशानुसार स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत बागडे आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. वैशाली चव्हाण यांची मालवण ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे तालुक्यातील नागरिकांना विशेषतः महिला व बालकांना अधिक दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.
जनतेला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळावी यासाठी आमदार निलेश राणे सातत्याने प्रयत्नशील राहिले असून, त्यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे ही नियुक्ती शक्य झाल्याचे मालवण नगरपरिषद आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी सांगितले.
या नियुक्तीबद्दल सभापती पूनम चव्हाण यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे, आरोग्यमंत्री प्रकाश आंबीटकर, पालकमंत्री नितेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा