You are currently viewing पुलवामा हल्ला

पुलवामा हल्ला

*काव्यनिनाद साहित्य मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ दीप्ती यादव यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृती जागृत करणारी लिहिलेली काव्यरचना*

*वृत्तबद्ध कविता*
*वृत्त- पादाकुलक*

*सैनिक*

*शीर्षक- पुलवामा हल्ला*

पुलवामाच्या हल्ल्यामध्ये
सि.आर.पि.एफ. लढत राहिले
लढता लढता प्राणपणाने
चौतीस वीर शहिद जाहले ||१||

जम्मू काश्मिर जिल्ह्य़ामध्ये
दहशतवादी हल्ला झाला
भारतभूच्या सेवेसाठी
सैनिक माझा कामी आला ||२||

संसाराचा मोह त्यागला
सरहद्दीचे रक्षण केले
थंडी,वारा,ऊन,पाऊस
अंगावरती सदा झेलले ||३||

छातीवरती गोळ्या झेलत
प्राण त्यागले अभिमानाने
शान तिरंगा भारतभूचा
फडकत आहे सन्मानाने ||४||

शूर पुतांच्या कर्तृत्वाचा
सांजसकाळी दिवा लावुया
वीर जवाना हात जोडुनी
आदरांजली आज वाहुया ||५||

सौ.दीप्ती दिलीप यादव
ता.खेड जि.रत्नागिरी
9881846518

प्रतिक्रिया व्यक्त करा