*आई भराडी देवी गीत*
आई भराडी माऊली, भक्तांच्या हाकेला धावली
ठेवून भक्तांवर, कृपेची सावली
भराडी माऊली तुझ्या कृपेने दिस सोन्याचा उगवला…..
आई तुझा दरबार, दिसतोय सुंदर, फुलांनी सजविला……!!धृ.!!
आलो तुझ्या गं राऊली,
दे आशीर्वाद माऊली…..
साऱ्या भक्तांवर असावी तुझी, आई कृपेची सावली
माथा ठेवून चरणावर, तुझी नजर भक्तांवर
जमलाय आई भाविक सारा, तुझी ओटी भरावला….!!१!!
साऱ्या भक्तांना वाटे गं,
आई तुझाच हेवा…
भोळ्या भक्तांना पावून आई, देशी भाग्याचा मेवा…
तूच भक्तांची कैवारी, साऱ्या भक्तांना तारी
जमलाय गं आई गोतावळा, तुझी आरती करावला..….!!२!!
आई लागला तुझा लळा,
भक्तांचा फुले हा मळा…..
तुझ्या चरणांशी वंदन करण्या, सारा भाविक होई हा गोळा
तुला वंदन करतो, चरणी माथा हा ठेवतो
*दिपक येडगे* आज गुणगाण गातो,दे आशीर्वाद भक्ताला.!!३!!
*(चाल:- एकविरा माऊली तुझ्या कृपेने दिस सोन्याचा उगवला….)*
✍🏻 *शब्दलेखन*✍🏻
_दिपक येडगे_
७७९८३४२८६१
कुसबे, कुडाळ, सिंधुदुर्ग
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻