You are currently viewing घर चिमणीचे

घर चिमणीचे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

पादाकुलक वृत्त

 

*”घर चिमणीचे”*

 

कणखर फांदी त्यावर शोभे

हिरवे हिरवे पर्ण कोवळे

छटा गुलाबी मोहक भासे

वसंतातले जणू सोहळे

 

संध्यासमयी रविराज उभा

पिया भेटण्या क्षितिजावरती

रंग तांबडा भगवा भासे

सांज उतरली धरणीवरती

 

काडी काडी जमवून कसे

बांधियले घर फांदीवरती

अन्न शोधण्या दिसभर फिरते

लक्ष तिचे बस घरट्याभवती

 

नभ चिंतेचे भाळी दिसते

पिल्लांच्याही सानसोनुल्या

वाट पाहती मग आईची

बसुन एकटक करुन वाकुल्या

 

चोचीमध्ये घेउन खाऊ

किलबिल मजला ऐकू येते

घास भरवता मुखात पिल्ले

उबेस चिमणी मिठीत घेते

 

© दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा