You are currently viewing सावंतवाडीतील केशवसुत कट्ट्यावर बसविण्यात आलेल्या तुतारीचे लवकरच लोकार्पण – बबन साळगावकर

सावंतवाडीतील केशवसुत कट्ट्यावर बसविण्यात आलेल्या तुतारीचे लवकरच लोकार्पण – बबन साळगावकर

दिलेला शब्द पूर्ण केला, सहकार्‍यांच्या उपस्थितीत कामाची पाहणी

सावंतवाडी

येथील केशवसुत कट्ट्यावर नव्याने बसविण्यात आलेल्या तुतारीचा लोकार्पण सोहळा येत्या दोन दिवसात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिली. दरम्यान “मी” घेतलेली जबाबदारी पार पाडली, हीच आमची ओळख आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला. श्री.साळगावकर यांनी आज आपल्या सहकाऱ्यांच्या उपस्थित केशवसुत कट्ट्यावर जाऊन तुतारीच्या कामाची पाहणी केली.
यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, संजय पेडणेकर, पत्रकार सीताराम गावडे, विनोद केसरकर, आनंद घोंगळे, संदीप कोळमकर, रवी जाधव आदी उपस्थित होते.

 

 

 

या तुतारीच्या नूतनीकरणाचे काम केशवसुत कट्ट्यावर सुरु आहे. ही कलाकृती माजगाव येथील काका सावंत,आनंद मसुरकर, नागेश मांजरेकर, कृष्णा कुडतरकर व धाकू सावंत यांच्या माध्यमातून साकारले जात आहे. जुन्या तुतारीची झालेली पडझड लक्षात घेऊन श्री.साळगावकर यांनी सामाजिक बांधिलकीतून या तुतारीच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले होते. त्यानुसार हे काम पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात त्याचे लोकार्पण केले जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा