You are currently viewing शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून कुडाळात किरीट सोमय्या विरोधात निषेध आंदोलन

शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून कुडाळात किरीट सोमय्या विरोधात निषेध आंदोलन

कुडाळ

भाजप नेते किरीट सोमय्या यांची अश्लील चित्रफित व्हायरल झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात आज उध्दव ठाकरे शिवसेना गटाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांच्या पोस्टरवर जोडे मारून निषेध करण्यात आला. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे या घटनेचा ठपका ठेवून भाजपने सोमय्या यांची पक्षातून तत्काळ हकालपट्टी करावी. “तो” व्हिडिओ माॅर्फ केलेला असेल तर त्यामागे नेमके कोण ? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते आणि महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांनी केली.

आज कुडाळ येथील शिवसेना शाखा येथे हे जोडे मारून आंदोलन करण्यात आले. यावेळी सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “नीम का पत्ता कडवा है, सोमय्या भ* है”, “या सोमय्याचे करायचे काय, खाली डोके वर पाय” अशा आशयाच्या घोषणा देऊन यावेळी सोमय्या यांच्या प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला. यावेळी महिला शिवसेना जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत म्हणाल्या की, या ठिकाणी सोमय्या यांची अश्लील चित्रफित व्हायरल झाली आहे. त्यामुळे त्या चित्रफीतीची चौकशी करण्यात यावी. ते दोषी असतील तर त्यांच्यावर भाजपने कठोर कारवाई करावी, अन्यथा त्यांची व्हिडिओ मॉर्फ केली आहे, असे कोणाचे म्हणणे असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.

तर जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी सुद्धा सोमय्या यांच्या कृत्याचा निषेध व्यक्त करत त्यांच्याकडून झालेला प्रकार निंदनीय आहे. त्यामुळे या प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करत असून त्यांच्याविरोधात आम्ही जोडो मारो आंदोलन केले आहे,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी अमरसेन सावंत, स्नेहा दळवी, रुपेश पावसकर, बबन बोभाटे, श्रेया गवंडे, राजू गवंडे, उदय मांजरेकर, ज्योती जळवी, श्रुती वर्दम, संदीप महाडेश्वर, गोट्या चव्हाण, दीपक आंगणे, बंड्या कोरगावकर, वैशाली पावसकर, काजल सावंत, गंगाराम सडवेलकर, निर्मला पालकर, अनघा तेंडोलकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा