You are currently viewing मिठाई व दुग्धजन्य पदार्थांच्या ट्रे- समोर ‘एक्सपायरी डेट’ टाकणे बंधनकारक अन्न औषध प्रशासनाचा निर्णय…..

मिठाई व दुग्धजन्य पदार्थांच्या ट्रे- समोर ‘एक्सपायरी डेट’ टाकणे बंधनकारक अन्न औषध प्रशासनाचा निर्णय…..

एक ऑक्टोबरपासून अंमलबजावणी ग्राहक पंचायतने केले या निर्णयाचे स्वागत…..

वैभववाडी प्रतिनिधी :

विविध मिठाईच्या दुकानांमध्ये ट्रेमध्ये विनापॅकिंग ठेवण्यात येणारी खुली मिठाई, दुधापासून बनवलेले पदार्थ यांच्या ट्रे समोर त्या पदार्थाची ‘एक्सपायरी डेट’ (मुदतीची तारीख) टाकण्याचे केंद्र सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाने बंधनकारक केले आहे. एक ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. या केंद्र सरकारच्या ग्राहक हिताच्या निर्णयाचे स्वागत ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभागाचे प्रभारी अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.श्री. एस. एन. पाटील जिल्हा संघटक श्री. एकनाथ गावडे व कोषाध्यक्ष श्री. संदेश तुळसणकर यांनी केले आहे.
मिठाई, दुधापासून बनवलेल्या अनेक पदार्थांसह वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ मिठाई किंवा इतर पदार्थ दुकानात ट्रेमध्ये भरुन खुले ठेवून विक्री केली जाते. विनापॅकिंग असणारा पदार्थ कधी बनवला आहे किंवा बनवण्यापासून ते किती दिवस खाण्यासाठी उपयुक्त आहे हे ग्राहकांना माहिती नसते. शहरासह ग्रामीण भागात मिठाई दुकानात सर्रास असे ट्रेमधील मिठाई व अन्नपदार्थ विक्री केले जातात. उघड्यावर ठेवलेली मिठाई, अन्नपदार्थ खाल्ल्याने विषबाधा होण्याचे प्रकार घडतात. अशा पदार्थांसमोरील ट्रे समोरच मुदत संपत असल्याची तारीख दिल्यास ग्राहकांना त्यांची माहिती मिळणार आहे. यामुळे खराब मिठाईची विक्री होणार नाही. याबाबत आदेश शुक्रवारी केंद्र सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाने काढले आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी ग्राहकांनीही जागृत व सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
दसरा दिवाळीत काय काळजी घ्यावी मिठाई खरेदी करताना ताजी मिठाई घ्यावी. आठ ते दहा तासानंतर मिठाई खाऊ नये, दसरा दिवाळीत माव्याची मिठाई असल्यास ती तासाभरात खावी. उघड्यावरील मिठाई लहान मुलांना खाण्यास देऊ नये.
मिठाईच्या दुकानांमध्ये मिठाई किंवा इतर अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री होते. त्यांना आता या पदार्थांच्या ट्रे समोर एक्सपायरी डेट लिहिणे बंधनकारक असेल. हा चांगला निर्णय असून राज्यात त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोरोना काळात लोकांनीही अधिक काळजी घेणे आवश्यक आहे अशी माहिती अरुण उन्हाळे आयुक्त, अन्न व औषध विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × five =