You are currently viewing आंबा-काजू बागायतदार संघाच्या अध्यक्षपदी जयप्रकाश चमणकर

आंबा-काजू बागायतदार संघाच्या अध्यक्षपदी जयप्रकाश चमणकर

वेंगुर्ला

आंबा काजू बागायतदार संघ स्थापन करण्यासाठी २१ फेब्रुवारी रोजी प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग व कुडाळ येथील आंबा, काजू उत्पादक शेतक-यांची बैठक जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संघाच्या अध्यक्षपदी जयप्रकाश चमणकर, उपाध्यक्षपदी दिव्या वायंगणकर व सचिवपदी अॅड.प्रकाश बोवलेकर यांची निवड करण्यात आली.

उर्वरित कार्यकारिणीमध्ये सहसचिव-सान्वी नेमण, खजिनदार-विरेंद्र आडारकर, सदस्य-दादा म्हाळवणकर, शिवराम आरोलकर, चेतन कुबल, ललितकुमार ठाकूर, विजय सरमळकर, बळीराम प्रभूतेंडोलकर, सुरेश धुरी, अनिल मांजरेकर, किशोर नरसुले, जगन्नाथ मांजरेकर, रत्नदीप धुरी, बाळा देसाई यांचा समावेश आहे. आंबा कॅनिगला ३५ रुपये किलो भाव मिळावा यासाठी शासन आणि कॅनिग प्रोसेस युनिटधारक यांच्याशी चर्चा करणे, किटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करुनही रिझल्ट मिळत नाहीत, यासाठी किटकनाशके विक्रेते, कृषी अधिकारी यांच्यासोबत चर्चा करणे, काजूला १६० रुपये हमी भाव मिळण्यासाठी प्रयत्न प्रकरणे आणि चारही तालुक्यात येत्या वर्षभरात संघाचे किमान दहा हजार सभासद करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 5 =