You are currently viewing दत्ताराम साटम यांचा वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आला सत्कार

दत्ताराम साटम यांचा वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आला सत्कार

*दत्ताराम साटम ‘भारतीय उत्कृष्ट नागरिक पुरस्काराने’ सन्मानित*

वैभववाडी

वैभववाडी तालुक्यातील करुळ गावचे सुपुत्र दत्ताराम आकाराम साटम यांनी आपल्या आयुष्यातील अडतीस वर्षे शैक्षणिक सेवा केलेली असून ते उपशिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी अशी सेवेची वाटचाल करून त्यांना त्यांच्या कारकीर्द अनेक पुरस्कार मिळालेले असून नुकताच त्यांना ‘भारतीय उत्कृष्ट नागरिक पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल ‘मुंबई शिक्षण संस्था’ अ.रा.विद्यालय,वैभववाडी या संस्थेच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधिक्षक तथा स्थानिक अध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक नादकर बी.एस., प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + fifteen =