You are currently viewing शिवसेनेच्या वतीने स्वीकृत नगरसेवक श्री. संतोष शिरसाट सर्वानुमते निवड

शिवसेनेच्या वतीने स्वीकृत नगरसेवक श्री. संतोष शिरसाट सर्वानुमते निवड

तर सौ. श्रेया गवंडे यांची बांधकाम आणि पर्यटन सभापती निवड

 

आज १८ फेब्रुवारी रोजी कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर विषय समिती सभापती निवड तसेच स्वीकृत नगरसेवक निवड देखील करण्यात आली. यावेळी सायंकाळी कुडाळ नगरपंचायत सभागृहात नगराध्यक्ष आफ्रिन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, शिवसेना ,काँग्रेस महाविकास आघाडीच्या सत्ताधारी सर्व नगरसेवक यांच्या बैठकीत विषय समित्यांच्या सभापती यांच्या निवड करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने सौ.श्रेया शेखर गवंडे यांना बांधकाम आणि पर्यटन सभापती पद देण्यात आले. तर उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांना पाणीपुरवठा सभापती पद, अक्षता खटावकर यांना महिला बालकल्याण सभापती पद आणि किरण शिंदे यांना आरोग्य व स्वच्छता सभापती पदासाठी निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीने स्वीकृत नगरसेवक म्हणून श्री संतोष शिरसाट यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − three =