दोडामार्ग तालुक्यात ठाकरे सरकारच्या विरोधात घंटानाद…..

दोडामार्ग तालुक्यात ठाकरे सरकारच्या विरोधात घंटानाद…..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली देवस्थाने सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने नियमावलींसह परिपत्रक जारी करुनही राज्य सरकारने महाराष्ट्रातील बरीच मंदिर उघडण्यासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे आज दोडामार्ग भाजपाच्यावतीने आघाडी सरकारच्या विरोधात घंटानाद करण्यात आला.
यावेळी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आघाडी सरकार हे तिघाडी सरकार असल्याचे म्हणत सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी दोडामार्ग तालुकाध्यक्ष संतोष नानचे, सुधीर दळवी, दोडामार्ग उपनगराध्यक्ष व भाजपा युवा मोर्चा उपजिल्हाध्यक्ष चेतन चव्हाण, माजी उपसभापती व विद्यमान प स सदस्य लक्ष्मण उर्फ बाळा नाईक, नगरसेविका उपमा गावडे, रंगनाथ गवस यांसह अनेक भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा