You are currently viewing भूपाळी रामरायासाठी

भूपाळी रामरायासाठी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सरिता परसोडकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*भूपाळी रामरायासाठी*

 

चला उठा रामराया, मुख प्रक्षालण करा

सोनसळी किरणांनी, बघा सजली ही धरा..

 

उटी केशरी घेऊनी , आला भास्कर उदेला

गाई हंबरी गोठयात ,वासरे हलवी पृच्छेला..

 

सारी सजली अंगणे ,सडा रांगोळी ती दारी

ओठामध्ये रामनाम ,आली वासुदेव स्वारी..

 

सजली आम्रवृक्षावरी, आंब्यांनी डहाळी

बघा पाणवठयावरी, शोभते लव्हाळी..

 

नीलवर्णी आकाशाला विहंग घाले गवसनी

चैत्र पालवी टाकते लिंबलोन उतरूनी..

 

 

सो सरिता परसोडकर पुसद✍🏻

प्रतिक्रिया व्यक्त करा