You are currently viewing भाजपच्या वतीने मालवणात १८, १९ फेब्रुवारीला आधार नोंदणी आणि दुरुस्ती शिबीर

भाजपच्या वतीने मालवणात १८, १९ फेब्रुवारीला आधार नोंदणी आणि दुरुस्ती शिबीर

भाजपा कार्यालयात आयोजन ; सुदेश आचरेकर, दीपक पाटकर यांची माहिती

मालवण :

भारतीय जनता पार्टी मालवण यांच्या वतीने १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी भाजपच्या कोणार्क रेसिडन्सी येथील कार्यक्रमात नवीन आधारकार्ड नोंदणी आणि दुरुस्ती शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी नवीन आधारकार्ड साठी पॅनकार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक असून नावात बदल, जन्मतारीख बदल, फोटो, मोबाईल नंबर बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता भासेल. शासकीय दरानुसार हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुदेश आचरेकर, दीपक पाटकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा