You are currently viewing हिम्मत असले तर बंगल्यावर येऊन दाखवा; भाजपाचे प्रतिआव्हान

हिम्मत असले तर बंगल्यावर येऊन दाखवा; भाजपाचे प्रतिआव्हान

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थाना समोर आंदोलन करणार असे आव्हान देताच प्रति आव्हान देत भाजपा कार्यकर्ते राणेंच्या बंगल्या बाहेर एकवटले. हिम्मत असले तर बंगल्यावर येऊन दाखवा असे प्रतिआव्हान भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे यांनी दिले. त्यामुळे काँग्रेस ने आंदोलन करण्याचा इशारा देऊन नाहक कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बंगला हा खाजगी आहे शासकीय नाही त्यामुळे येथे आंदोलन करता येणार नाही.उगाच आम्हाला आव्हाने देऊ नका असा इशारा यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा