You are currently viewing कणकवलीत मोबाईल शॉप ला आग; लाखोंचे नुकसान

कणकवलीत मोबाईल शॉप ला आग; लाखोंचे नुकसान

कणकवलीत मोबाईल शॉप ला आग ; लाखोंचे नुकसान

कणकवली

शहरातील लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्समधील एका मोबाईल शॉपीला सोमवारी सकाळी ७ :३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाणी मारून आग आटोक्यात आणायचा प्रयत्न केला.

मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आली नाही. अखेर नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन बंब आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र शॉप मधील मोबाईल व साहित्य जळून खाक झाली असल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदरची आग ही शॉर्ट सर्किटबे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, संजय मालडकर, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी अण्णा कोदे, संतोष पुजारे, चेतन अंधारी दत्ता शंकरदास, संजय राणे, राजू पारकर, शेखर गणपत्ये, आबा माणगावकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने मदतीसाठी धावून आले होते..

प्रतिक्रिया व्यक्त करा