You are currently viewing जय जय रघुवीर समर्थ

जय जय रघुवीर समर्थ

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना

भोळी वेण्णा वयही कोवळे
प्रपंचास पारखी
प्रौढपणे एकाकीच वाहे
दुःखाची पालखी

वास्तव स्वीकारिले कसोटी
समज वर्तनाची
रामभक्तीची गोडी उपजत
श्रवण कीर्तनाची

भागवताची सोबत तुळशी
वृंदावनी आसरा
हरिभक्तीची वाट गवसली
भक्तीच्या निर्झरा

कानी पडता समर्थ वाणी
निजानंद पावली
जसा भाव हो तसा देव ही
प्रचिती अनुभवली

जीव शिवही आत्मा परमात्मा
संभ्रम ते मिटले
उपदेशातुन घडली शिष्या
प्रश्न मनी सुटले

पारमार्थिक अधिकारे पटला
जीवनातला अर्थ
हात मस्तकी गुरुचा जय जय
रघुवीर समर्थ

अरविंद
16/5/21

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 1 =