You are currently viewing भारतीय स्टेट बँक (SBI) ग्राहकांना सतर्क राहण्याचा इशारा…..

भारतीय स्टेट बँक (SBI) ग्राहकांना सतर्क राहण्याचा इशारा…..

नवी दिल्ली:

व्हाट्सएपचा (what’s app) वापर करणाऱ्यांसाठी भारतीय स्टेट बँक (SBI)ने काही अलर्ट जारी केले आहेत. एसबीआयने जारी केलेल्या अलर्टनुसार व्हॉट्सअ‍ॅपवर केलेली छोटी चूक तुमच्या बँक खात्यात अडथळा आणू शकते. सध्या सायबर गुन्हेगारांनी व्हाट्सएपचा वापर करून नागरिकांच्या बँकेतील पैसे लंपास करण्यावर भर दिला जात आहे.
त्यामुळे भारतीय स्टेट बँक (SBI) ग्राहकांना सतर्क राहण्याचा इशारा ट्विटरच्या माध्यमातून दिला.
सध्या व्हाट्सएपच्या माध्यमातून ग्राहकांना सायबर गुन्हेगार टारगेट करत आहेत. खोटे मेसेज पाठवून ग्रहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगत SBI ने ग्राहकांना अलर्ट केलं आहे.
सोशल मीडियाचा वापर लाभदायक असला तरी तितकाच घातक असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे SBI ने ग्राहकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 10 =