You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रातील स्पोर्ट्स क्लब, स्कुबा डायव्हिंग वर गोव्यातील एजेंट कमावतात माल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रातील स्पोर्ट्स क्लब, स्कुबा डायव्हिंग वर गोव्यातील एजेंट कमावतात माल

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विनापरवाना सफर साठी मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी करतात कमाई*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनारे स्वच्छ आणि सुंदर आहेत, त्यामुळे अनेक पर्यटकांना हे समुद्रकिनारे भुरळ पाडतात. परंतु देशात समुद्र किनाऱ्यासाठी गोव्याचे नाव सर्वदूर पसरले असल्याने आणि मद्य पिण्यासाठी देखील गोवा सोईस्कर असल्याने पर्यटक जीवाचा गोवा करण्यासाठी गोव्यात येतात, तिथे वास्तव्य करतात. परंतु समुद्रातील साहसी सफर, स्कुबा डायव्हिंग सारखे स्पोर्ट्स अनुभवण्यासाठी गोव्यातील पर्यटन एजेंट त्यांना मालवण तालुक्यातील तारकर्ली, देवबाग , वेंगुर्ल्यातील वेळाघर, शिरोडा आदी ठिकाणी घेऊन येतात. गोव्यात साहसी पर्यटनाचे दर अवाजवी असल्याने गोव्यातील पर्यटन एजेंट पर्यटकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पोर्ट्स क्लब वाले समुद्र सफर, साहसी क्रीडा, स्कुबा डायव्हिंग आदींसाठी दीडशे, अडीचशे ते आठशे रुपयांचे पॅकेज देतात, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वच्छ समुद्रकिनाऱ्याचा आनंद लुटण्यासाठी गोव्यातील स्पोर्ट्स क्लब एजेंट मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पोर्ट्स क्लब वाल्यांकडून स्वस्तात पॅकेज घेऊन गोव्यातील पर्यटकांना तेच पॅकेज साडे तीन ते चार हजार रुपयांना देतात. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पोर्ट्स क्लब च्या जीवावर गोव्यातील मस्तवाल एजेंट पैसे कमावून मालामाल होतात आणि जिल्ह्यातील स्पोर्ट्स क्लब वाले स्पोर्ट्स कडून चा परवाना नसल्याने मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना हफ्ते देत गपगुमान धंदा करतात.

गोव्यातून आलेल्या पर्यटकांच्या गाड्या एका स्पोर्ट्स क्लब कडे थांबल्यास दुसरा स्पोर्ट्स क्लब वाला आपला भाव कमी करून गिर्हाईक खेचतो, त्यामुळे गोव्यातील स्पोर्ट्स क्लब च्या पर्यटन एजेंटची चांदीच होत असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पोर्ट्स क्लब कडे सरकारचा परवाना नसल्याने ते विनापरवाना सफर घडवतात. त्यामुळे मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी त्यांच्याकडून हफ्ते वसुली करून मड्यावरच लोणी खातात.

पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग, स्नोर्कलिंग, बनाना बोट राईड, जेट स्कायिंग, हाऊस बोट राईड, डॉल्फिन स्पोटिंग आदी सर्व प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय कमी दरात पर्यटकांना अनुभवायला मिळतात. त्यामुळे गोव्यातील पर्यटन एजेंटनी जिल्ह्यातील समुद्र स्पोर्ट्स च्या जीवावर बस, ट्रॅव्हलर्स घेतल्या आहेत आणि जिल्ह्यातील स्पोर्ट्स क्लब वाले मात्र आपापसात वाद घालत आहेत. जिल्ह्यातील साहसी पर्यटकांमध्ये नसलेल्या एकीचाच फायदा गोव्यातील पर्यटन एजेंट घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील समुद्र स्पोर्ट्स क्लब एजेंटनी एक होऊन पर्यटनातून पैसा कमविला पाहिजे, तरच जिल्ह्यातील पर्यटन नावारूपास येईल आणि जिल्हा खऱ्या अर्थाने पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जाईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा