वेंगुर्ला :
सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सिंधुदुर्ग या संस्थेची वेंगुर्ला शाखा आपल्या स्वःमालकीच्या जागेत स्थलांतरीत झालेली आहे. 11 फेब्रुवारीला शाखेचा थाटात शुभारंभ करण्यात आला. सदर स्थलांतरण सोहळयाचे उद्घाटन वेंगुर्ला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री. दिलीप गिरप यांच्या शुभ हस्ते फित कापुन करण्यात आले. त्यावेळी नगरसेविक सौ. श्रेया मळेकर व संस्थेचे चेअरमन श्री. शिवराम गणेश जोशी, व्हा. चेअरमन श्री. हिंदवाळ भगवान केळुसकर, संचालक श्री. पिटर फान्सिस डॉन्टस, श्री. चंद्रकांत दाजी शिरसाट, श्री. दिनानाथ लक्ष्मण सावंत, श्री. बाबुराव अर्जुन कविटकर, श्री. सुभाष कुडाजी सावंत, श्री. मंगेश सावाजी गांवकर, श्री. भिवा वावाजी गावडे, श्री. नामदेव सिताराम चव्हाण, सी. स्वाती राणे व कार्यलक्षी संचालक तथा मुख्यकार्यकारी अधिकारी श्री सुनिल राऊळ, शाखा समीती सदस्य कॅ. प्रताप राणे, श्री. देवेंद्र गावडे, श्रीमती सरोज परव, श्रीमती शुभांगी गावडे, श्री. रामकृष्ण मुणगेकर, श्री. चंद्रशेखर जोशी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. पुर्वी संस्थेची वेंगुर्ला शाखा गावडेश्वर मंदिरासमोर कार्यरत होती. पण आता पाटील चेंबर्स, दाभोली नाका वेंगुर्ला स्व-मालकीच्या जागेत स्थलांतर झाल्यामुळे लोकांना देण्यात येणा-या सेवेत अधिक तत्परता येणार आहे. तसेच अधिक ग्राहक हे संस्थेशी जोडले जाणार आहे. तसेच राष्ट्रियकृत बँकाप्रमाणे ग्राहकाभिमुख सेवा संस्था देत असल्याकारणाने त्याचा लाभ आजुबाजुच्या सर्व जनतेने घ्यावा असे आवाहन या वेळी चेअरमन श्री. शिवराम गणेश जोशी यांनी केले.