You are currently viewing विठ्ठल

विठ्ठल

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा जनसंपर्क अधिकारी विलास कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*विठ्ठल*

 

पंढरपुरी ज्याचे राऊळ

बाप माझा श्री विठ्ठल l

 

कार्तिकी आषाढीला

वारकरी होती गोळा

राहतो भक्तांच्या जवळ

बाप माझा श्री विठ्ठल l

 

सुख दुःखात तो पाठी

धाऊन येतो भक्तांसाठी

कैवारी त्याचा जो दुर्बल

बाप माझा श्री विठ्ठल l

 

कमी पडत नाही काही

जातपात तो पाहत नाही

रंक राव सारखेच सकल

बाप माझा श्री विठ्ठल l

 

त्याचा मोठा गोतावळा

संगे संतांचा जमे मेळा

नाम त्याचे गोड मधाळ

बाप माझा श्री विठ्ठल l

 

जनीचे दळतो दळण

दामाजीला पुरवी धन

मनाने आहे जो निर्मळ

बाप माझा श्री विठ्ठल l

 

विलास कुलकर्णी

मीरा रोड

7506848664

प्रतिक्रिया व्यक्त करा