You are currently viewing मालवण कट्टा येथील शिवसेनेच्या महिला मेळाव्यालाही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण कट्टा येथील शिवसेनेच्या महिला मेळाव्यालाही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

*आम. वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ*

मालवण :

शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मालवण कट्टा येथे आयोजित केलेल्या महिला मेळाव्याचा शुभारंभ आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीप्रज्वलन व छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. माणगाव प्रमाणे या महिला मेळाव्याला देखील कट्टा पंचक्रोशीतील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.

मेळाव्यामध्ये महिलांसाठी पैठणी स्पर्धा घेण्यात आली. तसेच हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला आ. वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले,शिवसेनेच्या प्रयत्नांतून जिल्ह्यात सुरू होत असलेल्या शासकीय मेडिकल कॉलेजसाठी यावर्षीपासून प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी आता एम.बी.बी.एस होणार आहेत. परिणामी जिल्ह्यात चांगले डॉकटर उपलब्ध होतील. महिलांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी शिवसेना काम करत असून सिंधुरत्न योजनेतून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. महिलांनी कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी सोडू नये. त्यासाठी शिवसेना सर्वोतपरी सहकार्य करेल. अशी ग्वाही आ. वैभव नाईक यांनी दिली.

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, विनोद आळवे, महिला उपजिल्हासंघटक देवयानी मसुरकर, महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत, सौ. लाड, लता खोत,सुगंधा गावडे, विष्णू लाड,डॉ. गोपाळ सावंत, सोमनाथ माळकर, दादा वायंगणकर, निलेश हडकर, बाबू कांबळी,यशवंत भोजने,आकेरकर सर, सौ. नागवेकर, शांती नाईक, शाखा प्रमुख देवानंद रेवडेकर, जगदीश ओरोसकर आदींसह कट्टा पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =