You are currently viewing राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंजुरीनंतर तीनही कृषी विधेयकांचं कायद्यात रुपांतर…

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंजुरीनंतर तीनही कृषी विधेयकांचं कायद्यात रुपांतर…

नवी दिल्ली

संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळालेल्या शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही तीनही  विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील मान्यता दिली आहे. राष्ट्रपतींनी तीनही कृषी विधेयकांवर स्वाक्षरी केल्यांनंतर आता या तीनही विधेयकांचे कायद्यात रुपांतर झालं आहे.

मोदी सरकारनं संसदेच्या पावसाळी अधिवेशनात तीन कृषी विधेयकं सादर केली होती. या कृषी विधेयकांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी मोठा गदारोळ केला होता. मात्र, तरी देखील मोदी सरकारनं आपल्या बहुमताच्या जोरावर  तीनही कृषी विधेयके मंजूर करून घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + seventeen =