You are currently viewing दशावतारातील लोकराजा हरपला..

दशावतारातील लोकराजा हरपला..

दशावतारातील लोक राजा म्हणून परिचित असलेले तसेच दशावतार कला सातासमुद्रापार नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेली नेरूर येथील ज्येष्ठ दशावतार कलावंत सुधीर कलिंगण यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ही घटना रात्री २.०० वाजता घडली. त्यांच्यावर गोवा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या अचानक जाण्याने जिल्ह्यातील दशावताराची मोठी हानी झाली आहे.

दशावतार ही कोकणची लोककला टिकवण्यासाठी सुधीर कलिंगण यांनी नवोदित कलाकारांसाठी सातत्याने मार्गदर्शन केले. सुरुवातीस वनराज नाटकात बालवनराजच्या भूमिकेतून ते प्रथमच रंगमंचावर आले. त्यात चिलियाबाळ, रोहिदास आदी भूमिकाही केल्या आहेत. त्यानंतर वडिलांनी १९८६ साली स्वतंत्र कलेश्वर दशावतार नाटय़ कंपनी काढली. त्यापूर्वीही १९८४-८५ मध्ये खानोलकर दशावतार कंपनी चालवण्यास घेतली होती. त्यात वडिलांसह ते दोघे भाऊ बाळ कामे करायचे. कधी कधी स्त्रीपात्राची भूमिकाही निभावली. हे सगळं करत असताना दिवसभर एसटी विभागात चालकाची भूमिकाही त्यांनी सक्षमपणे सांभाळली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + seven =