You are currently viewing महात्मा गांधी

महात्मा गांधी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ आदिती मसुरकर यांची हुतात्मा दिनी लिहिलेली काव्यरचना*

 

 

भारताच्या इतिहासात ,

अहिंसेचा मार्ग धरिला .

सत्याग्रहाचा आग्रह करीत ,

स्वातंत्र्याचा झेंडा रोविला….

 

उच्च विचार राहणी साधी,

होती शिदोरी संस्कारांची.

प्रत्यक्ष कृतीतून आपुल्या ,

दिक्षा दिली स्वावलंबनाची….

 

मातृभूमीची व्यथा पाहुनी ,

हृदयास त्यांच्या पाझर फुटले .

रंजल्या गांजल्या लोकांसाठी,

आयुष्य आपुले समर्पित केले…

 

स्वातंत्र्याच्या या महामेरूने ,

करेंगे मरेंगे चा संदेश दिला .

चले जाव चे नारे देऊन ,

अन्यायाला विरोध केला….

 

दुरीतजनांचे अश्रू पुसून,

सुख देऊ सकल जनास..

देशसेवेचे व्रत घेऊन,

करू प्रणाम या महात्म्यास,

 

 

*©✒️सौ.आदिती मसुरकर*

*कुडाळ ,सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा