You are currently viewing भाजपा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने डाॅ. दिलीप पवार यांचा सत्कार

भाजपा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने डाॅ. दिलीप पवार यांचा सत्कार

कोवीडच्या काळात मुंबईस्थित डाॅ. दिलीप रामदास पवार यांनी विश्व हिंदु परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिव्हील हाॅस्पीटल , आरोग्य केंद्र , नगरपरिषदा तसेच ग्रामपंचायत व विविध सामाजिक संस्थाना ५००० पी.पी.ई.कीट , शेकडो ऑक्सीमीटर , हजारो मास्क , सॅनीटरायझर इत्यादी वस्तू मुबलक प्रमाणात दिल्या . तसेच मुंबईच्या ठिकाणी जर रुग्णांना मदत हवी असल्यास मदतही पुरवली .


कोरोना काळातील त्यांच्या अद्वीतीय कार्याची दखल घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशन कोरोना वाॅरीयर अवार्ड २०२० , टाईम्स ऑफ इंडिया कोरोना वाॅरीयर अवार्ड २०२० , इंडियन रेड क्राॅस सोसायटी वाॅरीयर अवार्ड २०२० , मुंबई महानगरपालिका , इंडिया टुडे अशा नामांकित संस्थांनी त्यांचा ” कोरोना योद्धा ” म्हणून गौरव केला .
त्यांनी केलेले कार्य लक्षात घेता त्यांच्या सेवाभावीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना शाल व सन्मानपत्र देऊन नगराध्यक्ष राजन गिरप व भाजपाचे प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते गौरवण्यात आले .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर ,जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके , वैद्यकीय आघाडीचे डाॅ. अमेय देसाई , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल व बाळा सावंत , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर , प्रभारी ज्ञानेश्वर केळजी , ता.चिटनीस जयंत मोंडकर , अॅड. सुषमा खानोलकर , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , वृंदा मोर्डेकर , रसीका मठकर , ओंकार चव्हाण तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा