You are currently viewing शनिवारी होणा-या आरटीपीसीआर चाचणीला शिक्षक भारतीचा तीव्र विरोध!

शनिवारी होणा-या आरटीपीसीआर चाचणीला शिक्षक भारतीचा तीव्र विरोध!

.. हा अन्यायकारक निर्णय तातडीने रद्द करावा जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

सामुहिक बहिष्कार घालण्याचा इशारा

तळेरे :प्रतिनिधी

सोमवारपासून विद्यार्थ्यांची शाळा सुरू करावी असे पत्रक माध्यमिक शिक्षणाधिकारी या काढले असून इ.१ली ते इ.१२ वी ला कार्यरत असणा-या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आज शनिवार दि.२९ रोजी स.९ ते दु.२ या वेळेत सरसकट आरटीपीसीआर चाचणी करावी असा आदेश देण्यात आला आहे. आदेशाला शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटनेने कडाडून विरोध करीत हा अन्यायकारक निर्णय तातडीने रद्द करण्याची लेखी मागणी जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी व माध्यमिक, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात शिक्षक भारती ने केली आहे.
प्रशासनाच्या निर्णयाला सर्व शिक्षक सामुहिक बहिष्कार घालणार असल्याची माहिती शिक्षक भारती चे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर, प्राथमिक शिक्षक भारती चे जिल्हा अध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली आहे.
मागील आठवड्यात इतर काही जिल्ह्यामध्ये शाळा सुरू झाल्या आहेत पण, अशा प्रकारे तिथे कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही मग, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांनाच RTPCR चाचणीसाठी का वेठीस धरले जाते? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
कोरोनाचा प्रसार फक्त शिक्षकांमुळेच होतो असा गैरसमज प्रशासनाचा झाला आहे, मुळात शिक्षकांचे लसीकरणाचे दोन्ही डोस झाले आहेत,तसेच मुलांची शाळा बंद होती पण.. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नियमितपणे शाळेत हजर होते,कर्मचाऱ्यांची शाळा बंद नव्हती आणि त्यांनी मुख्यालयही सोडलेलं नाही नियमितपणे शाळेत हजर राहून ऑनलाइन वर्ग घेतले आहेत.जर शिक्षकांची शाळाच बंद नव्हती मग, त्यांना आरटीपीसीआर करण्याची सक्ती का करता? असा सवाल त्यांनी केला असून सर्वाची शनिवारी होणारी कोरोनाची चाचणी प्रशासनाने त्वरित रद्द करावी अशी मागणीही संजय वेतुरेकर व संतोष पाताडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 8 =