कुडाळ :
बॅरिस्टर नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये स्वरनिनाद अंतर्गत महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांनी रचलेले आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांनी स्वरसाज दिलेले सुश्राव्य भावगीत काव्य *गीत रामायण* याचे सादरीकरण होणार आहे .सादर करते आहेत -निनाद आजगावकर आणि सहकारी. *वेळ* सायंकाळी ६.३० ते ९ *स्थळ*– शैक्षणिक भवन कुडाळ एम.आय.डी.सी. या संगीतमय कार्यक्रमाचा सर्वांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.