You are currently viewing मुंबई-गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकरांचे नाव द्या…

मुंबई-गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकरांचे नाव द्या…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची मागणी; तहसील प्रशासनाला निवेदन सादर…

सावंतवाडी

मुंबई-गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी आज सावंतवाडी पत्रकार संघाच्या माध्यमातून करण्यात आली. तशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार मनोज मुसळे यांना मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण मांजरेकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, संतोष सावंत, अमोल टेंबकर, राजेश मोंडकर, उमेश सावंत, नरेंद्र देशपांडे, दीपक गावकर, जतिन भिसे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा