You are currently viewing दोडामार्ग ते विजघर रस्त्यावर पडलेले खड्डे पावसाळी डांबराने बुजवले जावे यासाठी उद्या 15 ऑगस्ट ला संदेश वरक व विष्णू मुंज यांचे उपोषण

दोडामार्ग ते विजघर रस्त्यावर पडलेले खड्डे पावसाळी डांबराने बुजवले जावे यासाठी उद्या 15 ऑगस्ट ला संदेश वरक व विष्णू मुंज यांचे उपोषण

दोडामार्ग ते विजघर रस्त्यावर पडलेले खड्डे पावसाळी डांबराने बुजवले जावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उद्या स्वातंत्र्यदिनी बांधकाम विभागाच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे तथा  VJNT जिल्हाअध्यक्ष अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत  काँग्रेस यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाअध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस VJNT तालुकाअध्यक्ष संदेश वरक व सामाजिक कार्यकर्ते विष्णू मुंज या समवेत उपोषण करणार आहेत.


बांदा ते दोडामार्ग रस्त्याची डागडुजी पावसाळी डांबराने केली जात असल्यास, दोडामार्ग ते विजघर रस्त्यावरील खड्डे जांभ्या दगडाने का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने सार्वजनिक बांधकाम विभागाला केला होता. दोडामार्ग ते विजघर रस्त्याची डागडुजी पावसाळी डांबराने करणेबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उद्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादी काँग्रेस उपोषण करणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा