You are currently viewing व्यर्थ ना हो बलिदान
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

व्यर्थ ना हो बलिदान

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर यांचा अप्रतिम लेख

नुकताच एक किस्सा वाचला.एक गृहस्थ विमानाने जयपूरला चालले होते.आणि बोर्डींग चालू असताना,त्यांच्या विमानात काही मिलीटरीचे जवान आले.ते सारे प्रशिक्षणासाठी चालले होते…विमान आकाशात स्थिर झाल्यावर,हवाई सुंदरी एकेकाकडून खाद्यपदार्थाची आॅर्डर घेत होती…डोमेस्टीक
उड्डाण असल्यामुळे खाद्यपदार्थ विनामूल्य नव्हते.त्या जवानांनी आपसात ठरवले की विमानात ,महागडे पदार्थ घेण्यापेक्षा आपण पोहचल्यावर लंच घेऊ.त्या गृहस्थाने हे ऐकले.
व त्याने हवाईसुंदरीला त्या जवानांना जेवण द्यायला सांगून पैसेही भरले.थोड्यावेळाने पायलट स्वत: बाहेर आले आणि या गृहस्थाचा त्यांनी सर्वांसमोर गौरव केला…आणि काय नवल..
प्रत्येकाने त्या गृहस्थाजवळ जमेल तसे पैसे दिले…भरपूर रक्कम जमली…विमान पोहचल्यावर त्या सर्वांनी अत्यंत कृतज्ञतेने ती रक्कम जवानांकडे सुपुर्द केली….
जवानांच्या महान देशकार्याला दिलेला एक
छोटासा कृतज्ञ भावाचा अविष्कार होता तो…
हे वाचल्यावर माझेही मन अभिमानाने भरले .
मनात विचार आले,
देशभक्ती म्हणजे नक्की काय…स्वातंत्र्य दिनी झेंडा वंदन…हुतात्मा दिनी मानवंदना..महान स्वातंत्र्य नेत्यांच्या जयंत्या ,पुण्यतिथ्या..सिनेमागृहात राष्ट्रगीताच्या वेळी ऊभे राहणे.अगदी अलीकडे कोरोनाच्या काळात डाॅक्टर्स’ ,परिचारीका, सफाई कामगार
यांच्यासाठी वाजवलेल्या सामुहीक टाळ्या,थाळीनाद..की क्रिकेट मधे भारत जिंकल्यावर वाजवलेले फटाके……
बस्!ईतकीच आपली देशभक्ती…??
मग अपराधी वाटतं…काय करतो आपण देशासाठी..लोकशाही साठी..भक्कम एकीसाठी..सीमेच्या सुरक्षेसाठी..थंडी वारा ऊन पाऊस सोसून प्राणांची बाजी लावून लढणार्‍या ,
देशासाठी शहीद होणार्‍या सैनिकांसाठी….
नेते भ्रष्ट.मतांसाठी राजकारण..सत्तेसाठी धडपड.पक्षांतर्गत पक्षाबाहेर, विरोधकांच्यात भांडणे …चिखलफेक..आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक..प्रेम सत्तेचे..या सगळ्यात
देश कुठे आहे..राष्ट्रप्रेम फक्त भाषणांपुरतं..
एक नागरीक म्हणून तरी आपण डोळस आहोत का..?मग सहज प्रश्न येतो..७५वर्षे झाली स्वातंत्र्याला पण ज्यांनी यासाठी बलीदान दिलं
ते व्यर्थ तर जात नाही ना…
दहशतवादाने देश पोखरलाय…सीमेवर कित्येक
जवान प्राणाचे दान देताहेत..स्वातंत्र्यानंतरही
लढाया चालूच आहेत..चीन पाकीस्तान बांगला देश..कारगील..ऊरी गलवान पुलवामा…
आपले जवान रक्त सांडत आहेत आणि आपण
मशगुल आहोत,जात धर्म वंश भेदात…
मजहब नही सिखाता आपसमे बैर रखना…हे फक्त गाण्यातच…
पण सीमेवर लढणार्‍या सैनिकाला जात धर्म नसतो…तो फक्त भारतीय असतो…आणि भारतासाठी असतो…
सरहदपर मरनेवाला हर वीर था भारतवासी…
माध्यमांचीही चीड येते.कुणा सुशांतची आमहत्या ..
महिने नी महिने चर्चा..आर्यन खानच्या बातमीला प्रचंड महत्व…पण शहीद झालेला म्हात्रे जाधव स्क्रोलवर…त्यांचे उघडे पडलेले संसार..त्यांचे वृद्ध मायबाप, लहान मुले, तरुण पत्नी..देश ठेवतो का आठवण. त्यांची ..??
कोरोनाशी सामना करताना कित्येक डॉक्टर्स परिचारिका सफाई कर्मचारी यांना रुग्णांची सेवा करताना प्राण गमवावे लागले…
कुणाच्या जीवावर आपण सुरक्षित आहोत
याची आठवण आपण ठेवली पाहिजे…
कर्तव्यबुद्धीने ,जगताना नियम पाळले पाहिजे..
प्रथम राष्ट्र नंतर स्वत: …हा विचार बळावला तरच यांचे बलीदान व्यर्थ जाणार नाही…
आणि हे स्वत:पासून सुरु झाले पाहिजे…

निदान..

जो शहीद हुए है उनकी
जरा याद करो कुरबानी…..

*सौ. राधिका भांडारकर पुणे*
*गृप नं ४*

प्रतिक्रिया व्यक्त करा