You are currently viewing स्मृति भाग ४३

स्मृति भाग ४३

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ४३*

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

नाशिकच्या न्यू इंग्लिश स्कूल मधून आमची रवानगी इयत्ता पाचवीत पिंपळनेरला झाली . त्यावेळेची जंगले वा गावाबाहेरील आमराई , वनराई काय वर्णू ? भर दुपारी बारा ते तीन या वेळेत भीतीपोटी कुणी तिकडे फिरकत नव्हते ? पण आज काही नाही !! पिंपळनेर गावापासून अठरा किलोमीटरवर एक वार्सा नावाचे गाव आहे . सगळी आदिवासी वस्ती . कोकणी , मावची व भिल्ल या जाती . तिथे सतीची यात्रा दरवर्षी भरते . तपासाअंती एकाने कहाणी सांगितली . एक ब्राह्मण कुटुंब रहायला आलं किंवा रहात होतं फक्त नवरा बायको ! काही वर्ष राहिल्यावर ब्राह्मण देवाघरी गेला . सोबत आता कुणी राहिलं नाही म्हणून ब्राह्मण स्त्री सती गेली ! असं चित्र प्रत्यक्ष ज्यांचे वडिलांनी वा आजोबांनी डोळ्यांनी पाहिलं असेल , जे कधीच पाहिलं नव्हतं ! सती जाणं हा त्यांचे नजरेत दैवी चमत्कारच ! म्हणून तिच्या नावाची ती *सतीची यात्रा* . मला ब्राह्मणांचं संस्कृती विषयीचे योगदान आणि वानप्रस्थ त्यावेळेस कळले होते !! आता पुढे जावू . *आपल्या समस्त धनाचा दक्षिणा यज्ञ करुन व अग्निंना आपल्यात समारोपित करुन वानप्रस्थीने सन्यासी व्हावं .* आज तर तृष्णाच संपत नाही संसाराची !! कशी संस्कृती उभी राहील ? व्हेंटिलेटरवर राहूनही पद आणि पैशामागे धावण्याची इच्छा माणसाला पशुत्वाकडे नाही नेत ??????????? यात संन्यासाचे रहाणे , खाणे , पिणे व विचार करणे याविषयी चर्चा आहे . सद्यः परिस्थिती कोरोनाची आहे , म्हणून आज पहिला श्लोक निवडला आहे , ज्याचा अंगिकार मनुनेही त्याचे स्मृतीत केला आहे .

 

*दृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं जलं पिबेत् ।*

*सत्यपूतां वदेद्वाचं मनःपूतं समाचरेत् ॥*

दृष्टिने पवित्र केलेल्या जागेवर पाऊल टाकावे , वस्त्राने गाळून पाणी प्यावे , सत्याने पवित्र केलेले वचन बोलावे , मनाने पवित्र आचरण करावे .

भारतीय संस्कृतीचे रोज वाभाडे काढणार्‍या एखाद्या साहित्तिकाची तरी अशी भाषा अहे का ?

पुढे , सर्व प्राण्यांचे भले इच्छिणारा , मित्रतेचा भाव असणारा , दगड आणि सोन्याचे ठाई समान दृष्टि ठेवणारा , नित्य ध्यानयोगात लीन असणारा भिक्षु परम गतीस प्राप्त होतो , असे सांगून ब्राह्मणाची सुंदर व्याख्या नजरेस पडते .

 

*जन्मना यस्तु निर्विण्णो मरणेन तथैव च ।*

*आधिभिर्व्याधिभिश्चैव तं देवा ब्राह्मणं विदुः ॥*

जन्म आणि मृत्यूचे बाबतीत जो निरस आहे वा वैरागी आहे वा अनासक्त आहे , निर्वेद आहे आणि जो मानसिक रोग वा उपाधि ( आधि ) व शारिरीक व्याधी ( व्याधी ) यांचेपासून वैराग्य प्राप्त झालेल्या विद्वानाला *ब्राह्मण* म्हणतात !

उद्या *अत्रिसंहितेतील* दहा ब्राह्मण प्रकारांचा विचार करु .

आज थांबतो . विनंती इतकीच , सर्वच स्मृति वाचनीयच आहेत . वाचाल ना ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा