You are currently viewing NCBच्या अधिकाऱ्यांवर हल्ला… जवळपास ६० जणांच्या टोळीने केला हल्ला…

NCBच्या अधिकाऱ्यांवर हल्ला… जवळपास ६० जणांच्या टोळीने केला हल्ला…

एनसीबीचे पथकावरील हल्ल्यानंतर अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर हिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पतीच्या तब्येतीची चौकशी बद्दल आभार व्यक्त करत एनसीबीच्या टीमचा अभिमान असल्याचंही म्हटले आहे.

 

मुंबई :

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणारे  नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकावर काल म्हणजेच मंगळवारी मुंबईतील गोरेगावात हल्ला झाला होता. यात दोन अधिकारी जखमी झाले आहेत. परंतु हल्लेखोर नेमके कोण आहेत, हे अद्याप कळू शकलेले नाही.

वानखेडे आणि त्यांच्या पथकावर जवळपास ६० जणांनी हल्ला चढवल्याची माहिती समोर येत असून या हल्ल्यात पथकातील दोन अधिकारी जखमी झाले. एनसीबीचे अधिकारी कॅरी मॅंडिस या ड्रग तस्कराला अटक करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच, मुंबई पोलीस तिथे पोहोचले होते आणि परिस्थिती नियंत्रणात आणून पथकातील अधिकाऱ्यांचा हल्लेखोरांपासून बचाव केला गेला. या प्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे.

या हल्ल्यानंतर समीर वानखेडे यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. समीर यांची तब्येत ठिक असल्याचं क्रांतीनं म्हटलं आहे. त्यांच्याबद्दल विचारपूस करणाऱ्यांचंही तिनं आभार मानले आहेत. तसंच एनसीबीच्या टीमचा अभिमान असल्याचंही क्रांतीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी क्रांतीनं समीर यांचा प्रचंड अभिमान वाटतो, असं सांगितलं होतं. ते प्रथम देशाचे आहेत मग आमचे,असंही क्रांती म्हणाली होती. इतकंच नव्हे तर त्यांची काळजी वाटते पण त्यांना पूर्ण पाठिंबा असून कोणत्याही परिस्थीतीत त्यांना सहकार्य करण्याची तयारी असल्याचंही क्रांती म्हटले आहे.

एनसीबीकडून गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करण्यात येत आहे.  एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे भारती सिंह हिच्या अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील घराची झडती घेतली होती. तिच्या घरातून गांजा हस्तगत करण्यात आला होता. गांजाचे सेवन केल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने भारतीसह पती हर्ष लिंबाचिया यांना अटक केली होती. या दोघांनाही मुंबईतील कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + twenty =