You are currently viewing शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सरसकट बंदचा निर्णय शासनाने मागे घेऊन कोरोना निर्बंधांसहीत शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी..

शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सरसकट बंदचा निर्णय शासनाने मागे घेऊन कोरोना निर्बंधांसहीत शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी..

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तहसीलदारांना निवेदन..

वेंगुर्ले

महाविकास आघाडी सरकारने सरसकट शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस बंदचा घेतलेला तुघलकी निर्णय अत्यंत चुकीचा व तितकाच दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर दुरगामी परिणाम होत आहेत. ऑनलाईन शिक्षण हे सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थी व दुर्गम/अतिदुर्गम खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. दोन वर्षांपासून शाळा,महाविद्यालये बंद असल्याने ग्रामीण व शहरी भागातील शैक्षणिक दरी वाढुन सर्वसामान्य जनतेची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर फेकले जात आहेत. यामुळे मुलांचे शिक्षणाचे गांभीर्य नष्ट होत असून त्यांचे नुकसान होत आहे.

राज्यभरात सुमारे एक लाख कोचिंग क्लासेस आहेत यामधुन दहा लाखांपेक्षा जास्त खाजगी शिकवणी घेणारे शिक्षक व प्राध्यापक शिकवतात. यावर अवलंबून असणारे कुटुंब व इतर पन्नास लाख लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. शिवाय विनाअनुदानित व इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षक यांची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, त्यांचेवर उपासमारीची नव्हे तर अक्षरशः आत्महत्येची वेळ आली आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थी अठरा वर्षे वयावरील आहेत,त्यांनी लसीचे दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत तर पंधरा वर्षांवरील लसीकरण सुद्धा वेगाने होत आहेत.

केवळ कोरोनाची भिती दाखवून राज्यभरातील शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस बंदचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शाळा बंदच्या या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

राज्यभरात सर्वच व्यवसाय कोरोना निर्बंधासहीत सुरु आहेत. तेव्हा सरकारने कोरोनाचे नियम लावून शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी.

सरकारने दिनांक २६ जानेवारी पर्यंत शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा आदेश द्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन तहसीलदार यांना भाजपा वेंगुर्ले च्या वतीने देण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , प्रभारी ज्ञानेश्वर केळजी , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , मठ शक्ती केंद्र प्रमुख विद्याधर बोवलेकर , आरवली शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक , शिरोडा शक्ती केंद्र प्रमुख विद्याधर धानजी , वेतोरे शक्ती केंद्र प्रमुख सुधीर गावडे , अणसुर शक्ती केंद्र प्रमुख गणेश गावडे , आसोली शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर , उभादांडा शक्ती केंद्र प्रमुख निलेश मांजरेकर , परुळे शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे , म्हापण शक्ती केंद्र प्रमुख नाथा मडवळ व आनंद गावडे , बुथप्रमुख नितीन कोचरेकर इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा