You are currently viewing संदर्भ ग्रंथ : जीवनविद्या दर्शन : निसर्गनियम

संदर्भ ग्रंथ : जीवनविद्या दर्शन : निसर्गनियम

✒️ *प्रकरण: निसर्गनियम* .

 

*मानवी जीवनात निसर्गनियमांना फार महत्त्वाचे स्थान आहे,याची जाणीव न झाल्यामुळेच मानवी जीवनात अनेक कूट प्रश्न निर्माण होतात.निसर्गनियमांच्या रेषेत जे जीवन जगण्याचा प्रयत्न करतातते जीवनात यशस्वी होतात,याच्या उलट निसर्गनियमांची रेषा कळत किंवा नकळत जे ओलांडतात ते जीवनात अपयशी ठरतात. किंबहुना एक पाऊल पुढे टाकून असे म्हणता येईल की निसर्गाचे नियम पाळण्यातच खरा धर्म असून निसर्गनियमांना लाथाडण्यात खरा अधर्म आहे.त्याचप्रमाणे निसर्गनियमांशी सुसंगत जीवन जगणे हीच खरी ईश्वराची उपासना असून निसर्गनियमांशी विसंगत जीवन जगण्यात ईश्वराची प्रतारणा आहे थोडक्यात,माणसाचे जीवन व विश्वाचे जीवन निसर्गनियमांनी बांधलेले आहे.हे निसर्गनियम सर्वांना सारखेच लागू असतात मग तो जंत असो,पंत असो,संत असो किंवा भगवंत असो.*

🎯 *”कराल ते भोगाल’ हा निसर्ग शक्तीचा अटळ नियम नीट लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे.*

🎯 *क्रिया व प्रतिक्रिया (Action and Reaction) यांच्या उभ्या-आडव्या धाग्यांनीच जीवनाचे वस्त्र विणले गेलेले आहे.*

🎯 *जो निसर्गनियम पाळतो त्याच्याजवळ ‘राम’ वास करतो,जो या नियमांना लाथाडतो त्याच्याजवळ ‘यम’ वास करतो.*

🎯 *निसर्गनियमांशी सुसंगत असे जीवन जे जगतात,त्यांच्यावर निसर्ग देवतेकडून कृपेची बरसात होते,त्याच्या उलट जे निसर्गनियमांना लाथाडतात त्यांना निसर्ग नियमांकडून लाथा खाण्याचे प्रसंग येतात.*

🎯 *”तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख-दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल”,हा निसर्गाचा अटळ नियम आहे.*

🎯 *तुम्ही इतरांचे भले करा,तुमचे भले होईल,तुम्ही दुसऱ्यांचे वाटोळे करा,तुमचे वाटोळे होईल.*

🎯 *आपण काय मानतो आणि काय मानीत नाही याला काहीही महत्त्व नसून निसर्गाचा कायदा काय असतो व तो काय करतो यालाच महत्त्व आहे.*

 

🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − three =