You are currently viewing सावंतवाडी पंचायत समिती गटांसाठी आरक्षण सोडत जाहीर

सावंतवाडी पंचायत समिती गटांसाठी आरक्षण सोडत जाहीर

सावंतवाडी :

 

सावंतवाडी पंचायत समिती सदस्य पदासाठीची आरक्षण सोडत येथील तहसीलदार कार्यालय येथे काढण्यात आली. या सोडतीत मळगाव पंचायत समितीसाठी अनुसूचित जाती स्त्री आरक्षण पडले आहे. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी महिलांसाठी इन्सुली व सातार्डा गटात आरक्षण पडले आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी सर्वसाधारणसाठी कोलगाव व न्हावेली आरक्षण जाहिर झाले आहे. सर्व साधारण स्त्री आरक्षण कलंबिस्त, विलवडे कारिवडे माजगाव चराठे व आरोंदा या गावांना आरक्षित झाले असून माडखोल आंबोली तळवडे शेर्ले मळेवाड बांदा व तांबोळी या गावात सर्वसाधारण म्हणजेच खुल्या गटासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 5 =