You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे पुंडलिक दळवी यांच्या पाठीशी – प्रांतिक सदस्य एम के गावडे 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे पुंडलिक दळवी यांच्या पाठीशी – प्रांतिक सदस्य एम के गावडे 

वेंगुर्ले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यावर कार्यालयात जाऊन मारहाण करणे हे निंदनीय आहे. एखाद्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यास दुसऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याने मारहाण करणे ही सिंधुदुर्गची संस्कृती नाही. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे दळवी यांच्या पाठीशी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एम. के. गावडे यांनी दिली.

यावेळी बोलताना गावडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पोलिसांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आहे. पोलिस खाते सखोल चौकशी करुन योग्य न्याय करील, हा आमचा ठाम विश्वास आहे.पुंडलिक दळवींना पोलिस खात्याकडून न्याय न मिळाल्यास पक्षाला गांभीर्याने दखल घ्यावी लागेल. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामंजस्याने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा. कायदा हातात घेण्यापेक्षा कायद्याचे काम पोलिस खात्याला करण्यास द्यावे. जिल्ह्यातील वातावरण खराब करण्याचे किंवा बिघडविण्याचे काम कोणी करु नये, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 9 =