You are currently viewing सावंतवाडी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांना पितृशोक…

सावंतवाडी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांना पितृशोक…

सावंतवाडी

माजगाव-खोतवाडा येथील सेवानिवृत्त पोलीस अर्जुन महादेव सावंत (९९) यांचे शनिवारी रात्री वृद्धपकाळाने निधन झाले. पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांचे ते वडील होत. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात मुलगे शिरोडा हायस्कुलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंद सावंत, माजगाव हायस्कुलचे शिक्षक शेखर सावंत, पत्नी , विवाहित मुली, जावई , सुना नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा