वेंगुर्ले
वायंगणी-बागायतवाडी येथे घरात सिलेंडरचा स्फोट होऊन वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला.
ही दुर्दैवी घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. वसंत गणेश फटनाईक (७०) व गणेश वसंत फटनाईक (२९), अशी त्या दोघांची नावे आहेत. सुदैवाने वसंत यांची पत्नी मासे विकण्यासाठी बाहेर असल्यामुळे त्या अपघातात वाचल्या. मात्र घर अर्धे जळून खाक झाले आहे.