You are currently viewing उद्या १८रोजी छात्रभारतीचा वर्धापन दिन…

उद्या १८रोजी छात्रभारतीचा वर्धापन दिन…

ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन

तळेरे

विज्ञानयुगातील विद्यार्थ्यांची समतावादी संघटना म्हणून गेली ३७ वर्षे छात्रभारती गरिब, शोषित, शेतकरी,
आदिवासी, कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काची लढाई लढत आहे. उद्या १८ डिसेंबर रोजी संघटनेचा वर्धापन आहे. या वर्धापन दिनाचे औचित्य साधत मुंबई छात्रभारतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी छात्रभारतीचे संस्थापक सचिव आमदार कपिल पाटील यांच्यासोबत संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे. अशी माहिती राज्य कार्यकारिणी सदस्य श्रीधर पेडणेकर यांनी दिली. या ऑनलाईन कार्यक्रमाला छत्रपती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 1 =