You are currently viewing मनोज जरांगे – पाटील यांच्या उपोषणाला चौकुळ गावाचा पाठिंबा

मनोज जरांगे – पाटील यांच्या उपोषणाला चौकुळ गावाचा पाठिंबा

सावंतवाडी :

 

मनोज जरांगे -पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज चौकुळ गावामध्ये सातेरी मंदिरात ग्रामस्थांची सभा अशोक गावडे, सुभाष गावडे, सुरेश गावडे, बापू गावडे ,विठ्ठल गावडे, वासू गावडे, पांडुरंग गावडे, पप्पू गावडे, सोनू गावडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

यावेळी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला एकमताने पाठिंबा देण्याचे ठरविण्यात आले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेले सात दिवस उपोषणास बसलेले मनोज जरांगे -पाटील यांच्या आरपार लढाईला सर्व मराठा समाज बांधवांनी गावागावात बैठक घेऊन उपोषण करावे असे आवाहन सावंतवाडी सकल मराठा समाज तालुकाध्यक्ष सिताराम गावडे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आज चौकुळ ग्रामस्थांनी एकत्र येत मनोज जरांगे – पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा व्यक्त केला व गावाच्या वतीने उपोषण छेडण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला वर्ग उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + one =