You are currently viewing ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात पारदर्शक कामगिरी करा हीच शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांना खरी श्रद्धांजली

ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात पारदर्शक कामगिरी करा हीच शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांना खरी श्रद्धांजली

भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष तथा ग्रा.प.सदस्य नवलराज काळे यांचे प्रतिपादन*

सरपंच,उपसरपंच,सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सडुरे शिराळे च्या वतीने मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन*

वैभववाडी

7 ऑगस्ट 2023 रोजी मेजर कौस्तुभ रावरणे यांना सीमेवरती लढताना वीरमरण येऊन पाच वर्षे पूर्ण झाली त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळेच्या वतीने सरपंच उपसरपंच सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलत असताना भाजप भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी मेजर कौस्तुभ रावराणे यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो मग ते क्षेत्र राजकीय,सामाजिक, व्यावसायिक असू दे ज्या त्या क्षेत्रातील कामात आपली पारदर्शकता असावी सत्य मार्गाने योग्य काम आपण केली पाहिजेत. जे सीमेवरती लढताहेत ते आपल्यासाठी आपल्या जीवाची परवा न करता दुश्मनांची लढा देतायेत त्यांच्यामुळे आपण देशांमध्ये सुखी आहोत निवांत आहोत त्यामुळे आपण पारदर्शकतेपणाने काम करणे अत्यंत गरजेचे आहे अशा प्रकारचे कार्य केलं तर तीच खरी शहीद मेजर कौस्तुभ दादा यांना श्रद्धांजली असेल त्यामुळे सर्वांनी योग्य मार्गाने काम करावं आपल्या जबाबदाऱ्या समजून गावातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याचे काम प्रत्येकाने केलं पाहिजे असे प्रतिपादन काळे यांनी केले. यावेळी प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापक विनोद करपे यांनी ही आपल्या भाषणात जे सीमेवर ती लढत आहेत त्यांच्या कुटुंबाची काळजी आपण घेतली पाहिजे. त्यांच्या कुटुंबाचा आपण सन्मान केला पाहिजे असे प्रतिपादन केले. यावेळी गावचे सरपंच दीपक चव्हाण उपसरपंच अनंत जंगम, मेजर कौस्तुभ रावराणे यांचे कुटुंब सदस्य अनिल रावराणे, ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, ग्रामपंचायत सदस्या प्रियांका पाटील, ग्रामपंचायत सदस्या विशाखा काळे, ग्रामपंचायत सदस्या रोशनी बाणे, ग्रामपंचायत सदस्य विलास जंगम, सोसायटी चेअरमन संतोष भोसले, ग्रामसेवक प्रशांत जाधव, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक श्री करपे, श्री कांबळे, श्री कुवर, श्री भैरळे प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी श्री महेंद्रकर, आरोग्य सेवक बोडेकर, आरोग्य सेविका चाफे, सर्व अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा