You are currently viewing सावंतवाडी येथील आरोग्य भुवनचे पंकज तुळसुलकर यांना मातृशोक…

सावंतवाडी येथील आरोग्य भुवनचे पंकज तुळसुलकर यांना मातृशोक…

सावंतवाडी

कारिवडे-पेडवेवाडी येथील प्रगतशील शेतकरी बागायतदार श्रीमती अर्चना अरविंद तुळसुलकर (वय ५७) यांचे काल दुपारी हद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. आरोग्य भुवनचे पंकज तुळसुलकर यांच्या त्या मातोश्री होत.
श्रीमती तुळसुलकर यांनी बुडीँपूल शेजारील खडतर डोंगरात मेहनतीने नारळ,सुपारी, काजूची बाग फुलवली होती. पती तथा आरोग्य भुवनचे मालक कै.अरविंद ऊर्फ अण्णा तुळसुलकर यांचे १२ वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर त्यांनी मोठ्या समर्थपणे कुटुंबाचा गाडा हाकत, शेती, बागायती केली. मसाल्याची पिके घेतली. शेती, बागायतीत त्या सतत सक्रिय होत्या. त्यांच्या दोन्ही मुली सौ.अश्विनी व मयुरी ह्या मल्टीनँशनल कंपन्या मध्ये पुणे येथे सव्हिँस मध्ये आहेत. मुलगा पंकज सालईवाडा येथे व तलावाकाठी आरोग्य भुवन हे पारंपरिक व्यवसाय असलेले दुग्धव्यवसायाचे दुकान चालवतात. त्यांची तब्येत ठिक वाटत नसल्याने त्या सबनिसवाडा- सावंतवाडी येथे आपल्या मूळ घरी आल्या होत्या. तिथून त्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयात गेल्या होत्या. त्यांना तिथेच दुपारी हद्यविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 1 =