You are currently viewing भंडारी मंडळातर्फे 21 ऑगस्टला विद्यार्थ्यांचा गुणवंत सोहळा

भंडारी मंडळातर्फे 21 ऑगस्टला विद्यार्थ्यांचा गुणवंत सोहळा

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे रविवार 21 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता कळसुलकर हायस्कूल सभागृहात भंडारी ज्ञातितील विद्यार्थ्यांचा गुणवंत सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दहावी परीक्षेत 75 टक्के पेक्षा जास्त व 12 वी परीक्षेत 60 टक्के पेक्षा जास्त गुण तसेच पदवी, पदव्युतर परीक्षेत 60 टक्के पेक्षा जास्त व विशेष प्राविण्यप्राप्त (राज्यस्तरीय ) मिळविले आहे, त्यांचा मंडळातर्फे सत्कार व गौरविण्यात येणार आहे तसेच इतर ज्ञातितील दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला गौरविण्यात येणार आहे संबंधित विदयार्थ्यांनी 18 ऑगस्ट पर्यंत नावनोंदणी करावी याबाबतचे अर्ज भंडारी भवन कार्यालयात उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी मंडळाचे सचिव दिलीप पेडणेकर 9423324083.. व नामदेव साटेलकर 9420204190 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा