You are currently viewing 16 जानेवारीला वेंगुर्लामध्ये लावणी, वेस्टर्न आणि क्लासिकल सोलो डान्स स्पर्धा..

16 जानेवारीला वेंगुर्लामध्ये लावणी, वेस्टर्न आणि क्लासिकल सोलो डान्स स्पर्धा..

वेंगुर्ला :

युवक व क्रीडा मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केन्द्र, सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम 16 जानेवारी रोजी श्री शिवाजी हायस्कूल येथील संस्थेच्या कर्मयोगी रामभाऊ तुळसकर सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय खुल्या गटासाठी वेस्टन डान्स क्लासिकल डान्स लावणी स्पर्धा अशा तीन प्रकारात सोलो डान्स स्पर्धा होणार आहेत. तिन्ही स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रुपये 1000 रुपये व प्रमाणपत्र व उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय यासाठी चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी सचिन परुळेकर यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा