*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हव्यास*
~~~~~~
जगणे सुंदर अन मरणेही सुंदर
सहज अर्थ त्याचा उमजत नाही
खेळ अतर्क , अटळ हा प्रारब्धी
भोगण्याविना इथे पर्यायच नाही
जन्मत: नाते पूर्वकर्म ऋणानुबंधी
उगा कधी कधी तोडता येत नाही
भावबंध सारेच कवडसे मृगजळी
त्यापाठी धावणे मात्र संपत नाही
आपणच गुंतूनी जातो केंव्हा कसे
अस्ताचली देखिल कळतच नाही
कळते सारे कुणीच कुणाचे नाही
तरी हव्यास जगण्याचा संपत नाही
तरीही क्षणक्षण सुखे जगता रहावा
सत्कर्माचा रस्ता कधीच सोडू नाही
~~~~~~~~~~~~~~~~~~
*वि.ग.सातपुते. (भावकवी)*
