You are currently viewing डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शिवसेनेत प्रवेश

डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई:;

 

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. काही दिवसांपू्र्वी आमदार मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता नीलम गोऱ्हेंच्या शिवसेना प्रवेशानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

हा प्रवेश एक ऐतिहासिक घटना आहे. कारण त्यांच्या प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं. शिवसेना-भाजपा युती किती मजबूत आहे आणि किती मनापासून झाली आहे ते आजच्या प्रवेशामुळे स्पष्ट झालं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं सरकार, युतीचं सरकार आपण आणलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे, प्रमोदजी महाजन, अटलजी सगळ्यांना अभिप्रेत असलेली युती आपण केली आहे. केंद्रात भाजपाची सरकार आहे. त्याच धर्तीवर युती सरकार स्थापन व्हावं ही सगळ्यांचीच इच्छा होती असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा