You are currently viewing जुलै महिन्यातील अतिवृष्टी, पुरहानी नुकसानी बांदा, शेर्ले येथील बाधित वंचित

जुलै महिन्यातील अतिवृष्टी, पुरहानी नुकसानी बांदा, शेर्ले येथील बाधित वंचित

नुकसानी न मिळाल्यास २६ जानेवारीला तहसील कार्यालयात उपोषणाचा इशारा

सावंतवाडी

सिंधुदुर्गात गेल्या वर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई बांदा आणि शेर्ले येथील नुकसानग्रस्त लोकांना अद्याप मिळाली नाही. येत्या आठ दिवसांत नुकसान भरपाई न मिळाल्यास 26 जानेवारीला तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसणार असल्याचा इशारा प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी वारंवार निवेदन देऊनही नुकसान भरपाई दिली नसून, ज्या लोकांचे नुकसान झाले नाही अशा लोकांची नावे सबंधित यादीत समाविष्ट करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. या नुकसान भरपाई वाटपात भ्रष्टचार झाला असल्याचा आरोप बांदा आणि शेर्ले येथील नुकसानग्रस्त लोकांनी केला आहे.

याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे बांदा आणि शेर्ले येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी करण्यात आलेल्या पंचयादीत ज्या नुकसानग्रस्तांची नावे समाविष्ट होती. त्यातील काही नावे दुसऱ्या यादीत वगळण्यात आली होती. यावेळी तहसीलदार कार्यालयातील शुभांगी शेवडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बेजबाबदारपणे व उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी जास्त नुकसान होऊन देखील शासनाने जाणीवपूर्वक या नुकसानग्रस्ताना नुकसान भरपाई पासून वंचित ठेवले असून, अपात्र लाभार्थ्यांना नुकसान भरपाई दिली आहे. त्यामुळे या नुकसान भरपाई वाटपात गैरव्यवहार आणि घोळ झाला असल्याचा आरोप त्यानी केला आहे. यावेळी येत्या आठ दिवसात यावर योग्य तो निर्णय घेऊन नुकसान भरपाई न दिल्यास येत्या 26 जानेवारी रोजी तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जर कायदा सुव्यवसथेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा भंग झाल्यास सावंतवाडी तहसीलदार आणि कारकून शुभांगी शेवडे जबाबदार राहतील असा इशारा देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − sixteen =