You are currently viewing चाईल्ड लाईनच्या वतीने शालोपयोगी वस्तूचे वाटप

चाईल्ड लाईनच्या वतीने शालोपयोगी वस्तूचे वाटप

सावंतवाडी
अटल प्रतिष्ठान संचलित चाईल्ड लाईन सावंतवाडीच्या वतीने आकेरी येथील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांचा सर्वे करण्यात आला. त्याअनुषंगाने मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील जी मुलं शाळेत जातात. अशा पंधरा कुटुंबातील मुला-मुलींना शालोपयोगी वाटप करण्यात आले. या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता चौथी ते बारावी पर्यंतच्या मुलांना व यांचे वाटप अखेर येथील सरपंच महेश जामदार यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. अटल प्रतिष्ठानच्यावतीने मुलांसाठी असे विविध उपक्रम राबवले जातात. त्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.या कार्यक्रमाला अशा वर्कर्स सौ. साक्षी खवणेकर, सौ. शोभा पाटील, चाईल्ड लाईनच्या समन्वयक कुमारी पुनम पार्सेकर मेंबर श्रीमती. प्रज्ञा तांबे अँड . चिन्मय वंजारी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा